टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागात लोकांच्या अडीअडचणीत जाणून घेण्यासाठी काल गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले त्या दौऱ्यात दामाजी कारखान्याच्या मयत संचालकाच्या जागेवर संचालकपदी प्रथमेश पाटील यांना घ्यावे अशी मागणी मारापुर येथे करण्यात आली.
लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याच्या संदर्भात आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी,आणि मारापुर या गावाचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्या दौऱ्यात ही मागणी करण्यात आली दोन वर्षांपूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समविचारी आघाडीने तगडे आव्हान उभे केले होते.
परिचारक व भालके समर्थकाला एकत्र आणून समविचारी आघाडी स्थापन करण्यामध्ये संचालक पी. बी.पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते विशेषता दामाजी कारखान्याच्या 18 हजार सभासदांचे सभासदत्व कायम राहावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये पी.बी. पाटील हे देखील होते.
दरम्यान पुण्यावरून गावी येत असताना उरळी कांचन जवळ झालेल्या अपघातात त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याजागी ती जागा गेली वर्षभरापासून रिक्त आहे.विद्यमान सत्ताधाऱ्याकडून त्या जागी त्यांचे सुपुत्र प्रथमेश पाटील यांना घ्यावे ही मागणी गेल्या काही महिन्यापासून केली जात आहे.
समविचारी आघाडीच्या नेतेसह विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाकडे पाठपुरावा केला मात्र त्याकडे सत्ताधाऱ्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आज ती मागणी खा. शिंदे यांच्याकडे करण्यात आले. यावर खासदार शिंदे यांनी चर्चा करून सांगू असे सांगत या विषयाला बगल दिली.
त्यामुळे पी.बी पाटलाच्या रिक्त जागेवर विद्यमान कारखान्याचे सत्ताधारी त्यांच्या मुलाला संधी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारखान्याचे सत्ताधारी हे भाजपचे निगडित आहेत तर खासदार या काँग्रेसच्या आहेत या राजकीय साठमारीत मृत मयत संचालकाच्या मुलाला संधी मिळणार का ? यावर तालुक्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.(स्त्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज