टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आता या भूमीला हरितवृक्ष भूमी म्हणून नवीन ओळख निर्माण करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी दि.२१ जून रोजी कृष्ण तलाव परिसरात दहा हजार वृक्ष लागवड करुन भविष्यात तो जोपासण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे. संतभूमी मंगळवेढ्याला हरित वृक्ष भूमी म्हणून नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रशासन व शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा अंगीकृत “वृक्षारोपण :-जीवन संगोपन” हा दहा हजार वृक्ष लागवडीची मोहीम लोकसहभागातून होणार आहे.
यावेळी महाडिक म्हणाल्या की,तापमान वाढीला रोखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा संकल्प हा प्रशासन व मंगळवेढ्यातील विविध संस्थांच्या सहकार्यातून करण्याचे नियोजन करत आहोत.
शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमार्फत यंत्रणा आणि साधारणपणे दहा हजार रोपांचे नियोजन करण्यात येणार आहे.
“वृक्षारोपण :-जीवन संगोपन” या कार्यक्रमांतर्गत चिलारमुक्त व निसर्ग युक्त मंगळवेढा तसेच वृक्ष बँक सीडबॉल व ऑक्सिजन पार्कचा समावेश असेल.
वृक्षारोपण कार्यक्रम 19 ते 21 जून आणि समारोप 21 जून रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधून कृष्ण तलाव मंगळवेढा या ठिकाणी सकाळी दहा वाजता करण्याचे प्रयोजन आहे.
याचे उद्घाटन इंग्लिश स्कूल प्रशालेत 20 जून रोजी करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल प्रेम,जिव्हाळा निर्माण व्हावा हा याचा उद्देश आहे. तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या पंढरपुरातील वारकऱ्यांना हे तयार केलेले सीड बॉल वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय ऑक्सिजन पार्क ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
कमी पाण्यावर येणारी वड,पिंपळ, कडुलिंब, करंज, चिंच व बांबू या प्रकारची रोपे मंगळवेढा आणि आसपासच्या खेडेगावात लावली जाणार आहेत अशी ही माहिती डॉ प्रियदर्शनी महाडिक यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज