टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून 24 वर्षीय व 25 वर्षीय अशा दोन तरूणी बेपत्ता झाल्या असून संबंधीत तरूणींच्या आई-वडीलांच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसात या घटनेची नोंद झाली असून पोलिस त्या बेपत्ता दोन तरूणींचा कसून शोध घेत आहे.
पहिल्या घटनेत यातील बेपत्ता 24 वर्षीय तरूणी ही मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून शहरातील सानिका पार्लर येथे पार्लर कोर्स करण्याकरीता दि.6 रोजी आली होती. तदनंतर सायं.6 वाजता ती परत घरी आली.
रात्री आठच्या दरम्यान घरामध्ये किरकोळ स्वरूपात भांडण झाले होते. कुटुंबातील सदस्य जेवणखाण करून झोपी गेल्यानंतर रात्री 11.30 वाजता त्या तरूणीच्या आईला जाग आल्यानंतर उठून पाहिले असता सदर मुलगी जाग्यावर दिसून आली नाही.
घराच्या आजूबाजूला, गावात, नातेवाईकाकडे, मैत्रीणीकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. तीचे वर्णन रंग गोरा, अंगाने मध्यम, नाक सरळ, चेहरा गोल,
उंची 5 फुट 1 इंच, अंगात नेसणेस पंजाबी ड्रेस, शिक्षण बारावी अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा.
दुसर्या घटनेत यातील 25 वर्षीय शहरातील तरूणी ही दि.7 रोजी टायपिंगचा कोर्स करून सायं.6 वाजता घरी आली होती. रात्री कुटुंबातील सर्वानी एकत्र जेवण करून ती बेडरूममध्ये झोपी गेली होती. पहाटे 3 च्या दरम्यान आई लघुशंकेसाठी उठल्यानंतर सदरची मुलगी घरामध्ये झोपलेल्या ठिकाणी दिसली नाही.
घराच्या आजूबाजूला, गावात, नातेवाईक, मैत्रीणीकडे शोध घेतला मात्र ती कोठेही मिळून आली नसल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तीचे वर्णन अंगाने मध्यम, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, उंची 5 फुट 2 इंच,
अंगात नेसणेस पंजाबी ड्रेस, भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलिस नाईक कृष्णा जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज