mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजीनामा देणार?, दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 5, 2024
in राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून जनतेने कौल दिला आहे. भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत.

2014 आणि 2019 साली भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत घडामोडीना वेग आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कॅबिनेट बैठक बोलवली असून आजच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

औपचारिकता म्हणून हा राजीनामा देण्यात येईल, त्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत राष्ट्पती त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार पाहण्याची सूचना करू शकतात. या नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडी सत्तास्थापनेसाठी औपचारिक दावा करण्याची शक्यता आहे.

राजधानीत घडामोडींना वेग

दरम्यान आज राजधानी दिल्लीमध्ये आज दोन मोठ्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. इंडिया आघाडीची आज संध्याकाळी बैठक असून एनडीएची देखील आजच बैठक होणार आहे.

या बैठकीसाठी बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. आज एनडीएच्या संयोजक पदावर चर्चा होणार असून आजच्या बैठकीत शपथविधीवर पण चर्चा होवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंडिया आघाडीची देखील आज संध्याकाळी बैठक होणार असून विरोधी पक्षात बसायच की, सरकार स्थापनेचा दावा करायचा? याची रणनिती ठरु शकते. तसेच इंडिया आघाडीचा आज पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

मित्र पक्षांना धाडला सांगावा

भाजपच्या वरिष्ठ नेते मित्र पक्षांची चर्चा करत आहेत. तर काल रात्री अमित शहा यांनी मित्र पक्षाशी संवाद साधला आहे. त्यांनी फोनवरून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे या चर्चेतून समोर आले. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रां दिली आहे.

राष्ट्रपतींकडून समोरोपीय भोजन

नवी दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडत आहे. आज रात्री राष्ट्रपतींकडून डिनरच आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्री डिनरला जाणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून समारोपीय डीनरचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
दुर्दैवी घटना! घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

खळबळ! प्रियकरासोबत मुलगी पसार, आई-वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं; पंगतीही उठल्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनल लावला

October 12, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! ‘या’ आधारित विमा योजना सुरू होणार; केंद्र सरकार योजना अंमलात आणणार; काय आहे विम्याची नवीन पद्धत?

October 8, 2025
काळजी घ्या! ‘गोवर’ची सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री? उपचार सुरू; अशी आहेत आजाराची लक्षणे

हाहाकार! 12 चिमुरड्यांचा जीव घेणाऱ्या ‘कफ सिरप’बाबत समोर आली थरकाप उडवणारी माहिती; ‘तो’ विषारी घटक… महाराष्ट्र सरकार अलर्टवर, घेतला सर्वात मोठा निर्णय

October 6, 2025
कौतुकास्पद! ठेकेदार उमेश मसाळ वास्तूरत्न पुरस्काराने सन्मानित; मंगळवेढ्यात कमी कालावधीत घरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव

कौतुकास्पद! ठेकेदार उमेश मसाळ वास्तूरत्न पुरस्काराने सन्मानित; मंगळवेढ्यात कमी कालावधीत घरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव

October 4, 2025
फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, टीम इंडियाचा धडाकेबाज निर्णय; दुबईत रंगला नाट्यमय थरार; नेमकं काय काय घडलं?

फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, टीम इंडियाचा धडाकेबाज निर्णय; दुबईत रंगला नाट्यमय थरार; नेमकं काय काय घडलं?

September 29, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापरे..! शंभर रुपयांच्या लाचप्रकरणी ४० वर्षे कोर्टात चकरा, आता हायकोर्टाने निर्णयच बदलला; नेमकं काय आहे प्रकरण?

September 30, 2025
Next Post
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

'400पार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला, भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला; 'सामना' अग्रलेखातून हल्लाबोल

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

ब्रेकिंग! निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा