मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचा विजयरथ रोखताना राम सातपुते यांचा 81 हजार 621 मतांनी विजय झाला आहे.
गेल्या दोन निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा झालेल्या पराभवाचा वचपा प्रणिती शिंदे यांनी काढल्याचे मानले जात आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 6 लाख 06 हजार 278 मते मिळाली आहेत.
विरोधातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 5 लाख 24 हजार 657 मते मिळाली आहेत. म्हणजेच प्रणिती शिंदे यांना 81 हजार 621 मतांनी विजयी घोषित केले आहे.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही मतदारसंघाचा अंतिम निकाल हा दुपारी तीनपर्यंत हाती येईल, असे सांगितले होते. मात्र, सोलापूरचा निकाला जाहीर व्हायला सायंकाळच्या पावणे सहा वाजल्या आहेत.
प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांचा २००४ च्या निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता.
आई आणि वडिलांच्या पराभवाचा आमदार प्रणिती शिंदे यांनी वचपा काढला आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये भाजपच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता.(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज