टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते.
या पार्श्वभूमीवर दाखल्याऐवजी अथवा काही कागदपत्रा ऐवजी त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जवळपास १ हजार ३०० ई सेवा आणि महा ई सेवा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ई सेवा केंद्रावरच अवलंबून रहावे लागत आहे. तर विविध तालुक्यात जवळपास १ हजार ३०० ई महासेवा केंद्राची संख्या आहे. ही सर्व ई सेवा केंद्रे आजपासून सुटीच्या दिवशीही सुरु ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, गॅप प्रमाणपत्र, उत्पन्न दाखल्याची गरज असते. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ते सहजासहजी उपलब्ध व्हावे, यासाठी महा ई सेवा केंद्रांना आता सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
तसेच ई सेवा केंद्र चालकांनी संबधितांना वेळेत कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अर्ज दाखल करतेवेळी त्यांचा मोबाईल नंबर अपलोड करुन त्यांना टप्याटप्याने पूर्वसूचना देण्याचे नियोजन करावे. अशा सूचनाही या आदेशात करण्यात आल्या आहेत.
सेतू कार्यालयाला मुहुर्त मिळालाच नाही
सेतू कार्यालय सुरु करावे, यासाठी विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि सेतू समितीने सेतू कार्यालय सुरु करण्यासंदर्भात टेंडरही काढले आहे. सेतू चालविण्याचे कामही एका कंपनीला दिले आहे.
मात्र त्या कंपनीला युजर आयडी मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार पाठपुरावा करुनही सेतू कार्यालय सुरुच झाले नाही. याची खंत अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज