टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये प्रचार करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. २ जून रोजी त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात परतावे लागणार आहे.
ईडीने केलेल्या अटकेला आणि ईडीच्या कोठडीला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
बुधवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी सुरु होताच ईडीचा कोणताही युक्तिवाद ऐकून न घेता सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनाचा आदेश दिला. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना मार्च २०२४ मध्ये अटक झाली होती.
प्रचार करण्याचा मौलिक, घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकार नसल्याने केजरीवाल यांना अंतरिम जामीन देता येणार नाही, हा ईडीचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
काम करण्यावर निर्बंध
केजरीवाल यांच्या प्रचार करण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. मात्र, उपराज्यपालांच्या संमतीशिवाय ते फायलींवर स्वाक्षरी करणार नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज