टीम मंगळवेढा टाईम्स।
माढा व सोलापूर लोकसभेची रणधुमाळी संपली. त्यामुळे जिल्ह्यातील निवांत झाले होते. मात्र, भाजपने पुढच्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील काही नेत्यांना पाठविले आहे.
त्यात माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निबाळकर यांच्यावर पुण्याची, आ.समाधान आवताडे यांच्यावर बीडची आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे जळगावची जबाबदारी सोपविली आहे.
त्यानुसार जिल्ह्यात प्रचार करून थकलेल्या नेत्यांना पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. माढा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघात काय होईल, याचा अंदाज बांधला जात आहे.
त्यात आता नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी दिल्याने त्यात मतदारसंघात निकाल काय लागेल, याची चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत.
ते इकडे आले.. हे तिकडे गेले..
सोलापूर आणि माढा दोन्ही मतदारसंघांत विखुरलेल्या पंढरपूर तालुक्यातील राजकारण चर्चेत राहिले. सुरुवातीला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे माढ्यात मोहिते-पाटलांच्या आणि सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात दिसले.
शरद पवार गटाची धुरा जवळपास त्यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात चित्र बदलले. अभिजित पाटलांनी फडणवीसांच्या साक्षीने महायुतीकडे आले.
तेव्हा त्यांचे विरोधक असलेले भगीरथ भालके हे सोलापुरात काँग्रेसच्या प्रचारत होते. माढ्यात मात्र शांतच होते,
शेवटच्या दोन दिवसांत अभिजीत पाटलांनी भूमिका बदल्यानंतर भालके यांनी मोहिते-पाटलांना साथ दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज