टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशभरात मतदान सुरु आहे. 4 जूनला लोकसभा मतदानाचा निकाल लागणार असून देशाचा कौल कुणाला आहे, हे स्पष्ट होईल.
देशात एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सत्ताधारी एनडीए अशी निवडणूक पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणूक कोण जिंकणार, कुणाचं सरकार येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना भारताबद्दलची एक भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय आहे.
फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांच्या भविष्यवाणीनुसार, भारतात नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा दावा केला जात आहे. फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांनी 500 वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का याकडे सध्या जगाचं लक्ष लागलं आहे.
नॉस्ट्रॅडॅमसची भारताबद्दलची भविष्यवाणी
काही अहवालांवर आधारित मीडिया रिपोर्टनुसार, नॉस्ट्रॅडॅमसने भारताबद्दल अनेक भाकीत आहे.
नॉस्ट्रॅडॅमसच्या एका भविष्यवाणीनुसार, भारतात 2014 पासून 20 वर्ष हिंदू नेता राज्य करेल, असं भाकीत केलं आहे. 2014 पासून भारतावर हिंदू राज्य येईल. हा नेता जगभरात मोठं नाव कमावेल, असाही उल्लेख असल्याचा दावा करण्यात येतो.
भारतातील हिंदू सत्तेबाबत भविष्यवाणी
मीडिया रिपोर्टनुसार, नॉस्ट्रॅडॅमसने भारतातील हिंदू सत्तेबाबत भविष्यवाणी केली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी ही भारतातील हिंदूंच्या राजवटीचं भाकीत आहे, असं मानलं जातं.
नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितानुसार, एकविसाव्या शतकात भारत महासत्ता म्हणून उदयास येईल जगावर वर्चस्व गाजवेल.
भारतात 2014 पासून हिंदू राज्य करतील. ते स्वर्ग आणि पृथ्वीवर राज्य करतील. आशिया खंडात त्यांना कोणीही विरोध करणार नाही. या भविष्यवाणीच्या आधारावर नॉस्ट्रॅडॅमसने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा अचूक अंदाज वर्तवल्याचा दावा केला जातो.
नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीत नेमकं काय म्हटलंय?
नॉस्ट्रॅडॅमसने भविष्यवाणीनुसार, ज्या देशाला तिन्ही बाजूंनी समुद्राचा वेढा असेल तो देश हिंदू सत्ता उदयास येईल. पूर्वेकडील एक नेता 20 वर्ष सत्ता सांभाळेल, असा नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणी उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. नॉस्ट्रॅडॅमसची ही भविष्यवाणी भारताबद्दल असल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, याआधीही नॉस्ट्रॅडॅमसच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. महासत्ता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सत्तेबद्दलचं भाकितही खरं ठरल्याचं सांगितलं जात.
कोण आहे नॉस्ट्रॅडॅमस?
नॉस्ट्रॅडॅमस हे एक फ्रेंच भविष्यकार होऊन गेले. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीबद्दल तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. नॉस्ट्रेडॅमस या फ्रेंच भविष्यकाराने 1566 मध्ये त्याच्या मृत्यूपूर्वी हजारो भविष्यवाण्या लिहिल्या होत्या. त्यांनी एकूण 6338 भविष्यवाण्यांमध्ये जगाबद्दलची अनेक भाकितं वर्तवली होती.(स्त्रोत: ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज