टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर किमान लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा भाजपच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांनी केला.
माढ्यातील पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विक्रमी मताने विजयी होतील असा दावा जिल्हाध्यक्षांनी केला. सोलापुरातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे किमान एक लाख २० हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा शहराध्यक्षांनी केला.
माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. मतदानाच्या दिवशी दुपार झाली की मतदारांचा कल लक्षात येतो; परंतु यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांचा मूड वेगळा असल्याचे दिसून आले.
सायंकाळ झाली तरी राजकीय जाणकार संभ्रमात होते. मतदान झाल्यानंतर मात्र प्रत्येकाने आपले अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. दोन्ही मतदारसंघांत मागील निवडणुकीच्या तुलनेत फारसे मतदान वाढलेले नाही. निकाल कसा लागेल हे अनेकांना सांगता येत नव्हते.
भाजपने सत्तेचा गैरवापर करून एकाच रात्रीत ३२ जणांना हद्दपार केले. मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला; परंतु मतदारांमध्ये रोष दिसून आला. शहर उत्तर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघातून आम्हाला मताधिक्य मिळेल.
शहर उत्तरमध्ये २०१९ च्या तुलनेत काँग्रेसला जास्त मतदान झाले आहे. आमदार प्रणिती शिंदे किमान ९० हजार ते १ लाख २० हजारच्या मताधिक्याने विजयी होतील असा आमचा अंदाज आहे. – चेतन नरोटे, शहराध्यक्ष, काँग्रेस.
मोहिते-पाटील विक्रमी मतांनी विजयी होतील
भाजपने मागील चार दिवसांत धनशक्तीचा मोठा वापर केला. नेत्यांना फोडले; परंतु मतदार आमिषाला बळी पडला नाही. शेतकरी, विविध समाजांतील तरुणांमध्ये आरक्षणाच्या विषयावरून भाजपविरुद्ध राग दिसून आला. मोहिते-पाटील विक्रमी मतांनी विजयी होतील. – शेखर माने, प्रदेश निरीक्षक, पवार गट. शहर उत्तर,
भाजपचे मताधिक्यही वाढले
अक्कलकोटसह सर्वच विधानसभा मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळेल. लोक उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी होते. प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक मतदार मतदान करू शकले नाहीत. अनेकांची नावे डिलीट झाली होती. ही नावे डिलीट झाली नसती तर मतदानाचा टक्का वाढला असता. भाजपचे मताधिक्यही वाढले असते. आमचा उमेदवार किमान एक लाख मताने विजयी होईल.- नरेंद्र काळे, शहराध्यक्ष, भाजप.
सातपुते एक लाखाच्या मताने निवडून येतील
सोलापूर लोकसभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षांच्या कार्याची पावती म्हणून उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी घेतला. सोलापूर राम सातपुते एक लाखाच्या मताने निवडून येतील, अशी- सचिन कल्याणशेट्टी, आमदार, जिल्हाध्यक्ष, भाजप.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज