टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील. माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अकलूजमध्ये केला.
माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबीयांनी विरोध केला होता. भाजपा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुधवारी सकाळी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर आले होते.
मोहिते पाटील आणि परिचारक यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाली. या दरम्यान शिवरत्न बंगल्यावर जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हजर होते. जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांची संवाद साधला.
जयसिंह म्हणाले, राजकारणात काही निर्णय घेताना वाट बघावी लागते. माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही.
केवळ माढाच नाही तर बारामती सोलापूर मतदारसंघातून ही भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही
आगामी विधानसभा निवडणुकीत माण, करमाळा, माढा विधानसभा मतदारसंघात ही भाजपाला यश मिळणार नाही. दरम्यान जयसिंह आणि मोहिते पाटील कुटुंबीयांनी धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात लवकरच प्रवेश करतील असे संकेत दिले.
अमोल कोल्हे मोहिते पाटील निवासस्थानी
माढा लोकसभेतून भाजपकडून रणजीतसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते-पाटील व रामराजे समर्थकांमधून विरोध सुरू होता. काही दिवसांनी विरोध कमी होईल, असे पक्षश्रेष्ठीकडून सांगण्यात येत होते.
मात्र हा विरोध कायमच राहिला. अखेर बुधवारी जयसिंह मोहिते-पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.
तत्पूर्वी मोहिते पाटलाची चर्चा करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही शिवरत्नवर पोहोचले.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. मात्र पाहूया पुढे काय काय होतं असे म्हणत वेट अँड वॉचची भूमिका कोल्हे यांनी मांडली. राज्यातही महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज