टीम मंगळवेढा टाईम्स।
मार्चअखेर सुरू असल्याने मुद्रांक निबंधक कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी सुरू आहे.
येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासकीय सुटीच्या दिवशी तसेच साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी व रविवारीदेखील मुद्रांक कार्यालये तसेच दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहतील, अशी माहिती
सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून बाजारमूल्याचे नवीन दर तक्ते प्रसिद्ध होतात. मार्चमध्ये सर्व दुय्यम निबंधक
कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२०२४ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) योजना सुरू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व
सर्व दुय्यम निबंधक कार्यालये २३ मार्च व २४ मार्च तसेच २९ मार्च ते ३१ मार्च कालावधीतील शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालये सुरू राहतील, अशी माहिती मुद्रांक कार्यालयाने दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज