टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सोलापूरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
नंदुरबार – गोवाळ पाडवी
अमरावती – बळवंत बसवंत वानखेडे
नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण
पुणे – रविंद्र हेमराज धंगेकर
लातूर – डॉ. शिवाजीराव काळगे
सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू शहाजी छत्रपती
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने प्रचारात उडी घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे अनेक नेत्यांना याचा फटका बसत असून आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे. यावर आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नेत्यांना गावबंदी करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांना घरबंदी करणे गरजेचे आहे. भाजपने आरक्षणाच्या प्रश्नावरून खेळी केली आहे. त्यामुळे त्यांना उघडं पाडण्यासाठी येत्या निवडणुकीत घरबंदी करणे गरजेचे आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडली.
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रणिती शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील गावभेटी दौऱ्यात होते. यावेळी तालुक्यातील कौठाळी येथे मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत त्यांच्या गाठीभेटीत गोंधळ घातला. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी गावबंदी नको तर भाजपच्या नेत्यांना घरबंदी करा, असे विधान केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज