टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर मतदारसंघासाठी लोकसभा काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार हे मंगळवारी निश्चित झाले. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे ज्या जागा काँग्रेस लढवणार आहे,
या मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठका पार पडल्या. सोलापूर मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला.
शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूरसाठी उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले.
दरम्यान प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून मंगळवेढ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
बैठकीला शहराध्यक्ष नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, रामहरी रूपनर, बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाध्यक्ष दोन दिवसात ठरणार…
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे एका प्रकरणात अडचणीत आल्याने प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय पटोले यांनी घेतला. या पदासाठी सुरेश हसापुरे यांना संधी देऊ नये अशी मागणी धवलसिंह समर्थकांनी पटोले यांच्याकडे केली.
त्यामुळे सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव पुढे आले, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे आता शिवाजी काळुंगे, हसापुरे, राहूल पाटील, विजयकुमार हत्तुरे, भीमाशंकर जमादार आदींची नावे पुढे आली आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज