टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला. हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे आज घडला.
काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्याला सुरवात केली आहे. आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता, त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
पाटखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत, बैठकीत राडा केला. यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
मनोज जरांगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काॅंग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसला. दरम्यान शिंदे यांनी बैठक न घेताच गावातून हताशपणे परतावे लागले. शिंदेच्या या बैठकीतील राड्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पाटकळ येथे ग्रामस्थांनी पाणी प्रश्नसह मराठा आरक्षणावरून त्यांना जाब विचारला. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे,अॅड नंदकुमार पवार, पांडुरंग जावळे, मारुती वाकडे आदी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी या भागात भागातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही व मराठा आरक्षणाला देखील प्रश्न मार्गी लागला नाही असे सांगून सभास्थळी मांडण्यात आलेल्या खुर्च्या व अन्य साहित्य अन्यत्र ठेवण्यात आल्यानंतर संयोजकांनी बैठक मंदिरात घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याही ठिकाणी ग्रामस्थांनी ठिय्या मांडल्याने मराठा आरक्षणावरून मी तुमच्यासोबत असल्याचे सांगून पुढच्या गावाकडे मार्गस्थ झाल्या.दरम्यान अॅड नंदकुमार पवार यांनी ग्रामस्थांची समजत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.
आ.प्रणिती शिंदे यांनी दुष्काळी 50 गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सह चारा छावणी सुरुवात करावी पाण्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना तालुक्यात पाण्याचे टँकर व चारा छावणी सुरू करण्याची मागणी करून देखील त्यांना सध्या जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यामुळे यापुढील काळात सत्ताधारी पक्षाला देखील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गाव भेट दौरा करताना देखील रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळू लागले आहेत.
व्हिडीओ बघा;-
तसा इशारा निंबोणी येथे घेण्यात आलेल्या 24 गावाच्या पाणी परिषदेच्या बैठकीत एका आंदोलकांने दिला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कराच्या आंदोलनात पाटकळ ग्रामस्थांनी या गावांना बाटलीभर ही पाणी मिळणार नसल्याचा सांगितल्यानंतर चक्क गावच्या वेशीवर राज्यकर्त्याच्या स्वागतासाठी बाटल्याचे तोरण बांधून दिला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज