mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 26, 2024
in राज्य
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू होईल.

एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेराव घालण्याची संधी असेल. तसेच शेतकरी, मराठासह अन्य समाजासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या अधिवेशनात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्नात असून, या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी समाजाच्या सगेसोयरे व्याख्येच्या अधिसूचनेविषयी सरकार काय निर्णय घेते? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असणार आहे.

तसेच राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीक पकडायला विरोधक आक्रमक झालेत. मराठा आरक्षण, पोलीस ठाण्यात गोळीबार, लोकप्रतिनिधीची हत्या, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पुण्यात सापडलेले ड्रग्ज, कांदा निर्यात बंदी, निवासी डॉक्टरांचा संप, यासह विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला वेढण्याच्या तयारीत आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगे यांनी आरोप केले होते. एकीकडे सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं असताना दुसरीकडे मनोज जरांगे मात्र ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षणासाठी ठाम असल्याचे दिसत आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू न देण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला

पूरवणी मागण्यांवर चर्चा मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच दुपारी 2 वाजता 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. अंतरिम अर्थसंकल्प 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यांच्या आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते, कर्जाची परतफेड, व्याज आणि लोकसभा निवडणुकीसाठी झालेला खर्च यांचा समावेश आहे.

असं असेल अधिवेशनाचे कामकाज

अधिवेशनाचे कामकाज विधिमंडळ सचिवालय ठरवते. पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण, त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दस आभार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार. 2023-24 साठी पूरवणी मागन्या सादर केल्या जातील. त्यानंतर शासकीय कामकाज सुरू होईल.

भाजप आमदार राजेंद्र पाटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर कामकाज झाले. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पुरवणी यांच्या मागण्यांवर चर्चा करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर 2024-25 चा अंतिम अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता सादर केला जाईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अर्थसंकल्प अभिवेशन 2024

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 11, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 10, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा