टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगे- सोयरे या शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत, या मागणीसाठी जिल्ह्यात आज शनिवारपासून चक्काजाम आंदोलन होणार आहे.
पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
पवार म्हणाले, मराठा समाजबांधव ११ तालुक्यांत विविध ठिकाणी आंदोलन करतील. आपल्या गावाच्या शेजारून जाणारा हमरस्ता, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद ठेवतील. आंदोलन शांततेत होईल. त्याला हिंसक वळण लागेल, असे कोणीही वागणार नाही.
आंदोलन सकाळी १०:३० वाजता सुरू करावे, दुपारी १:३० पर्यंत संपवावे. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मुलांना, पालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
यावेळी पुरुषोत्तम बरडे, रवी मोहिते, प्रा. गणेश देशमुख, विनोद भोसले, महादेव गवळी, अनंत जाधव आदी उपस्थित होते.
शहरात येथे होणार आंदोलन
२४ फेब्रुवारी रोजी मरिआई चौक, मंगळवेढा रोड
२५ फेब्रुवारी आसरा चौक, होटगी रोड
२६ फेब्रुवारी मार्केट यार्ड चौक, हैदराबाद रोड
२७ फेब्रुवारी हगलूरजवळ, तुळजापूर रोड
२८ फेब्रुवारी मल्लिकार्जुननगर, अक्कलकोट रोड
कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर मराठा समाजाने बहिष्कार टाकावा. कोणत्याही पुढाऱ्याला गावभेट करू देऊ नये. त्या पुढाऱ्याशी वाद घालू नका. त्यांना विनंती करून गावात कार्यक्रम घेऊ देऊ नका. मराठा समाजाची आरक्षणाची लढाई आपल्याला शांततेच्या, अहिंसेच्या मागनि लढायची आहे. ही लढाई ढाल आणि तलवारीची: नसून विचारांची आहे. विचारांनी लढायची आहे. – प्रा. गणेश देशमुख समन्वयक, सकल मराठा क्रांती मोर्चा
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज