टीम मंगळवेढा टाईम्स।
इन्स्टाग्राम आय.डी.वर धार्मिक संघर्ष निर्माण होईल व औरंगजेबाचे उदात्तीकरण होईल, अशी स्टोरी इन्स्टाग्रामला ठेवल्याप्रकरणी सोहेल रमजान पटेल, रमजान जैनुद्दीन पटेल (दोघे रा.कात्राळ, ता. मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून,
याप्रकरणी अजय भारत घुले (वय २६, रा. मरवडे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादी अजय घुले व मित्र आकाश जाधव, गणेश जगताप हे फिर्यादीच्या घरासमोर बसून मोबाईल फोनवर इन्स्टाग्राम पाहात असताना
मरवडे गावातील उमेश येडसे यांच्या सिंहगड नावाच्या गॅरेजवर कामास असणारा व फिर्यादीच्या ओळखीचा सोहेल रमजान पटेल याची इन्स्टाग्राम स्टोरी पाहत असताना,
त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर औरंगजेब यांचे व त्या पाठीमागे मुघलकालीन घुमटाकार ऐतिहासिक वास्तुचे चित्र ठेवून त्यावर हिंदीमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकून व त्या खाली औरंगजेब आलमगीर अशी स्टोरी ठेवून
त्याने रमजान पटेल नावाच्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम आय.डी.ला मेंन्शन केले. त्यानंतर रमजान जैनुद्दीन पटेल यानेही तीच स्टोरी त्याच्या इन्स्टाग्राम आय.डी.वर ठेवून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले.
सोहेल रमजान पटेल, रमजान जैनुद्दीन पटेल याने जाणीवपूर्वक दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असा स्टेटस ठेवल्याने धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज