टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायती व २२ ग्रामसेवकांचा सन्मान पंढरपूर येथे आज होणार आहे. राज्य शासनाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता
पंढरपुरात कोर्टी रस्त्यावर नवीन कराड नाक्यावरील यश पॅलेश येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.
या कार्यक्रमात प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा पारितोषिक देऊन सन्मान केला जाणार आहे. जिल्हास्तरावर मंगळवेढा तालुक्यातील (लमाणतांडा) बालाजीनगर या ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.
तर मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी गावचे सुपुत्र पंढरपूर येथील ग्रामसेवक शहाजी विठोबा शेणवे यांना देखील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण रक्षण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्द्यांवर १०० गुण देऊन प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एक ग्रामपंचायतीची आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजनेसाठी निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील या २२ ग्रामसेवकांचाही होणार सन्मान
रेखा इगवे, किरण वाघमारे, मनोज लटके, समीर शेख, राजकुमार काळे, राहुल कांबळे, राजअहमद मुजावर, शहाजी शेणवे, डी. एस. गोतसूर्य, भालचंद्र निंबर्गी, एन.बी. जोडमोटे यांची निवड झाली.
तसेच २०२२-२३ मध्ये अभयकुमार नेलुरे, रामेश्वर भोसले, सचिन सरडे, शिवाजी गवळी, सत्यवान पवार, अभिजित लाड, उज्ज्वला उमाटे, अविनाश ढोपे, योगिता शिंदे, शशिकांत कुंभार व कल्पना नारायणकर यांची निवड झाली. यांचाही सन्मान होणार आहे
या ग्रामपंचायतींचा पुरस्काराने होणार सन्मान
बालाजीनगर (मंगळवेढा), वागदरी (अक्कलकोट), अंबाबाईची वाडी (बार्शी), खडकी (करमाळा), वडाचीवाडी आऊ (माढा), पुरंदावडे (माळशिरस), आष्टी (मोहोळ), कौठाळी (उ. सोलापूर), तिसंगी (पंढरपूर), वाकी शिवणे (सांगोला), दिंडुर (द. सोलापूर).
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज