टीम मंगळवेढा टाईम्स ।
संतनगरीत गेल्या ४० वर्षापासून निर्माणाधिन असलेल्या श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरात गेल्या दोन दिवसापासून विविध धार्मिक विधी होम हवन यासह विविध कार्यक्रम सुरू असून येथील वातावरण भक्तिमय झाले आहे. महागणपती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आज दि.१४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दि.१२ रोजी सकाळी आरंभ संभारदान, दशरुणान, प्रायश्चित्त होम, शांती होम, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यवचन, मातृत्व पूजन, नांदी श्राध्द, आचार्यवर्णी आणि उद्दकशांती हे कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळी ९ ते १२ ‘श्रीं’च्या प्रतिकात्मक व देव देवतांच्या, साधू संतांच्या प्रतिमांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला.
मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळ सहभागी झाली होती. सायंकाळी मंडप पूजन, देवता स्थापना, अग्नी स्थापना, जलाधिवास, ग्रहयज्ञ, शय्याधिवास, धान्याधिवास विधी करण्यात आला.
रात्री साडेनऊ वाजता टीव्ही स्टार, सारेगमप फेम मराठी सिनेमातील सुप्रसिध्द गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचा ‘भक्ती संगीत रजनी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
काल दि.१३ रोजी सकाळी स्थापित देवता पूजन, प्रधान होम, सर्व देवी देवतांचा प्रधान होम करण्यात आला. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी प्रधान होम संत मूर्ती स्थापना करण्यात आली.
सायंपूजा व आरती झाली. ९.३० वाजता विदर्भातील नावाजलेले बाल कीर्तनकार श्री चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन झाले. दोन दिवसापासून हजारो भाविकांनी दर्शन घेतले आहे. दि.१४ रोजी सकाळी ११.५० ते १२.२० स्थापित देवता पूजन, श्री रिध्दी सिध्दा महागणपती व सर्व देवी देवतांच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
दुपारी १२:२० ते १ ‘कलशारोहण व सर्व देवी देवतांच्या शिखरावर ध्वजारोहण’ विश्व हिंदूपरिषद सत्संग प्रमुख दादासाहेब वेदक व प्रती देहू श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान, केजचे अध्यक्ष महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंदिर निर्माते अशोक कोळी यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज