टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे तर दुसरीकडे हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. शाळा, मॉल्स, अनेक व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिकांवर घरी बसण्याची वेळ आली. सगळेच जण घरात असल्यामुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर महाराष्ट्र सायबरनं प्रत्येक पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. Very important news for every parent, Maharashtra Cyber appealed
पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावं. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र सायबरने केलं आहे. 7 ते 18 वयोगटातील मुलांच्या पालकांनी ऑनलाईन सर्फिंगवर करताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं.
Cybercriminals and hackers are using sophisticated phishing techniques to steal the confidential data of netizens. When online, be alert, follow cyber safety precautions, and protect yourself from being a victim of phishing@DGPMaharashtra @Cyberdost #cybersecurity #cybersafety pic.twitter.com/MgvZDlPsrC
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) July 21, 2020
जर मुलं ऑनलाईन चॅटिंग करत असतील तर समोरची व्यक्तीची माहिती करून घेणं आवश्यक आहे.तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप आणि कॉम्पुटरद्वारे कोणत्या संकेतस्थळावर क्लीक करत आहेत किंवा कोणते संकेतस्थळ बघत आहेत यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
कारण गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आपली मुलं अशा कोणत्याही जाळ्यात अडकू नये याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे.
पालकांनी पोर्नोग्राफिक संकेतस्थळ शोधून क्लिक करणं टाळायला हवं. सध्या चाइल्ड पोर्नोग्राफी बघण्याचं प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कुणी ऑनइलान धमकावत नाही ना, याची खात्री करायला हवी. आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स आणि त्यांचे पिन क्रमांक पाल्यास देण्याचं टाळावं. ऑनलाइन खरेदी करताना मुलांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा अशा सूचना महाराष्ट्र सायबरकडून देण्यात आल्या आहेत.
आपला मुलगा कोणत्याही ऑनलाइन फसवणूक (fraud ) किंवा ऑनलाइन रॅकेटमध्ये किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचा शिकार बनले अशी माहीत हाती आल्यास घाबरून न जाता नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा द्या, असं आवाहन सायबर विभागाकडून देण्यात आलं आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज