टीम मंगळवेढा टाइम्स ।
न्यायालयासमोर खोटी माहिती देऊन खोटी कागदपत्रे हजर करून बाळू केराप्पा क्षीरसागर (वय ५२, रा.भाळवणी, ता.मंगळवेढा) हे जिवंत असताना मृत्यूचा दाखला देऊन न्यायालयाची दिशाभूल करून आदेश मिळविल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
महादेवी बाळू क्षीरसागर (४५), नेहरू ऊर्फ रमेश शंकर सुरवसे (५०), अंकुश शंकर सुरवसे (४७), सोपान जगन्नाथ जाधव (४५, रा. जित्ती), ग्रामसेवक भारत नारायण चंदनशिवे असे त्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी बाळू क्षीरसागर हे जिवंत असताना न्यायालयात जबाबाचे शपथपत्र देऊन फिर्यादी हा दि. १५ मार्च २०१५ रोजी जित्ती येथे मयत झाला आहे. आम्ही अंत्यविधीस हजर होतो. तसेच फिर्यादीचा मयताचा दाखला द्यावा असे शपथेवर कोर्टात जबाब दिला होता.
अशा रीतीने न्यायालयाची दिशाभूल करून कोर्टासमोर खोटी माहिती देऊन खोटी कागदपत्रे हजर करून फिर्यादी जिवंत असताना मृत्यूच्या दाखल्याप्रकरणी न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयाचा आदेश मिळविला.
या मृत्यू दाखल्याची नोंद ग्रामसेवक भारत चंदनशिवे याने दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी रेकॉर्डला केली होती. दरम्यान एवढेच नव्हे तर या मृत्यू दाखल्याच्या आधारे फिर्यादीच्या नावे असणारी जित्ती येथील घरजागा मालमत्ता क्र. १६४ व खवे येथील
शेतजमीन गट नं. १२/२ च्या रेकॉर्डला फेरफार क्रमांक ११७५ ने महादेवी क्षीरसागर हिने फिर्यादी मृत असल्याने वारस म्हणून स्वतःच्या दोन मुली व एका मुलाचे नाव लावले होते. अशा रीतीने सर्व आरोपींनी फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज