टीम मंगळवेढा टाईम्स।
मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून पायी पदयात्रा मुंबईकडे निघणार आहे.
त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातून 25 हजार मराठा बांधव या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत त्यासंदर्भातली मीटिंग मंगळवेढा मध्ये पार पडली.
यावेळी माऊली पवार म्हणाले की, तिकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत म्हणून आपण शांत बसणे योग्य नाही जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवावा.
त्याचबरोबर आपल्या कुणबी नोंदी आहेत काय याची शहानिशा प्रत्येक मराठा बांधवांनी करावी या आंदोलनादरम्यान जर मराठा समाज बांधवांना अटक झाली किंवा आडवण्यात आले तर
महिलांनी त्या मतदारसंघातील आमदार व खासदाराच्या घरी ठिया आंदोलन करून त्याचा निषेध नोंदवावा असे मत व्यक्त केले.
यावेळी राजन जाधव, गणेश देशमुख, श्रीरंग लाळे, महेश पवार आदींनी मार्गदर्शन केले सदर मोर्चेच्या नियोजनासाठी मंगळवेढा तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकांचे आयोजन केलेले आहे.
सदर मोहीम भरपूर दिवस चालणार असल्यामुळे जे सहभागी होणार आहेत त्यांनी आपली स्वतःची खाण्याची राहण्याची सर्व साहित्य सोबत घ्यावयाचे आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज