टीम मंगळवेढा टाईम्स।
पैशांच्या देण्या-घेण्यावरून येथील वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांनी विवाहित महिलेवर अत्याचार प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चार डॉक्टरांना न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता, त्यावर शनिवारी सुनावणी होऊन त्यांना ९ जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन अकलूज वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत अकलूज पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अकलूज येथील अकलाई हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिने उच्च शिक्षणासाठी ३५ हजार रुपये हॉस्पिटलकडून घेतले होते.
ते पैसे पगारातून वजा करावेत अशी विनंती पीडित महिलेने हॉस्पिटलकडे केली होती. मात्र या हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण भारत चंकेश्वरा, डॉ.सुनील सुभाष नरूटे, डॉ. शैलेश भानुदास गायकवाड व डॉ.सचिन सावंत (सर्व रा.अकलूज) यांनी
उसने दिलेले पैसे पगारातून न फेड करता तू आमच्याशी शारीरिक संबंध ठेव अशी त्या महिलेकडे मागणी करून फेब्रुवारी २०२२ ते २८ जून २०२२ दरम्यान अकलाई हॉस्पिटलच्या डॉक्टर रूममध्ये महिलेवर वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडितेने अकलूज पोलिस ठाण्यात ३ जानेवारी २०२४ रोजी दिली.
त्यावरून पोलिसांनी चार डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सर्व डॉक्टरांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ३० डिसेंबर २०२३ रोजी माळशिरस न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यांना ९ जानेवारीपर्यंत जामिन मंजूर झाल्याचे अकलूज पोलिसांनी सांगितले.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज