टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे.
दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आली आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित
केलेल्या भागांमध्ये देखील ही स्थगिती राहणार असून, सरकारच्या अन्य सवलती देखील या 1021 महसुली मंडळांना लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
कोणत्या सवलती मिळणार?
जमीन महसूलात सूट
सहकारी कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती
कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट
शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे
दरम्यान, राज्य सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता.
दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. यात राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.
ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के कमी पाऊस झाला, त्या भागामध्ये हा दुष्काळ जाहीर केला गेला आहे. तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे.
40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर
काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश सरकारने जाहीर केला. एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला.
राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज