टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र शासनातर्फे गुरुनानक चौकाजवळ बांधण्यात आलेल्या सुसज्ज १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे जानेवारी महिन्यात लोकार्पण होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
राज्य शासनाच्यावतीने जुन्या पोलीस आयुक्तालयाच्या जागेत २० फेब्रुवारी २०१९ रोजी या जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे रुग्णालय ३१ मार्च २०२३ रोजी बांधून पूर्ण झाले होते.
यातील इतर प्रलंबित कामे पूर्ण करून ३० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रुग्णालयाचा ताबा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला दिला आहे. या रुग्णालयाचे एकूण ९ हजार ७६० चौरस मीटर बांधकाम आहे.
वाहनतळ, तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला असे बांधकाम करण्यात आले आहे. १०० खाटांचे हे जनरल हॉस्पिटल असून या रुग्णालयात विविध आजारांची संबंधित तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त ऑपरेशन थिएटर, औषधोपचार आणि अन्य सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णालयाच्या आतील बाजूत अग्निशमन यंत्रणा बसवणे, ऑक्सिजन लाईनचे काम करणे,
पाच ऑपरेशन थिएटरचे काम पूर्ण करणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, सोलर व गिझरचे काम पूर्ण करणे, लिफ्ट बसवणे अशी कामे प्रगतीपथावर आहेत, असेही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज