टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर शहरातील नागरीकांना नागरी सुविधा मिळत नाहीत. नगरपरिषदकडून फक्त १० टक्के कर वाढ केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी २७, ४०, ७०, १०० तर ४०० टक्के कर वाढ झाली आहे. यामुळे शहरातील विविध पक्षाच्या नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांना घेरावा घालण्यात आला.
पंढरपुरातील सर्व रस्ते खराब आहेत. पाण्याचे पाणी अस्वच्छ पद्धतीचे मिळत आहे. आरोग्याबाबत सुविधा नाहीत. शिक्षणाचा विषेश कर लावला आहे मात्र पंढरपुरातील शाळा बंद आहे. वृक्ष लागवडीचा कर मात्र वृक्ष लागवडीचे कर आकरण्यात येतो.
नागरी सुविधा देत आणि कर वाढविला जातो हा चुकिचा निर्णय आहे. करवाढीला स्थगिती देण्यात यावी. अन्यथा जन आंदोलन करणार असल्याचा ईशारा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे नेते साईनाथ अंभगराव, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, समाजाचे नेते अरुण कोळी, राष्ट्रवादीचे सुधीर भोसले, मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले, संदिप मांडवे, महादेव धोत्रे, ऋषीकेश भालेराव, धनंजय कोताळकर,
कॉग्रेसचे नेते नागेश गंगेकर, संजय ननवरे, ॲड.दत्तात्रय पाटील, अभिजीत पाटील, माने, बापू शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे तालुकाध्यक्ष व नेते यांच्यासह महाविकास आघाडी पक्षाचे अन्य नेतेगण उपस्थित होते.
दुष्काळ ग्रस्त पंढरपूर तालुक्यात कर वाढ
पंढरपूर तालुक्याला दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना कर माफ केला जातो. शिक्षण फी माफ केली जाते, विद्यूत बीलात सवलत दिली जाती.
मात्र पंढरपूर शहरात सवलती मिळणे व नागरीकांचे कर माफ होणे गरजेचे असतानाही नगरपरिषदेकडून कर वाढ करण्यात आली आहे. हे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
नागरीकांपेक्षा आमदारांना त्यांचा पक्ष महत्त्वाचा
गल्ली पासून दिल्ली पासून विद्यमान आमदरांचे सरकार आहे. परंतु सर्व सामान्य जनतेची पिळवणूक करण्याचे त्यांच्या पक्षाचे धोरण आहे. यामुळे ते ह्याच धोरणाप्रमाणे काम करत आहेत.
शहरातील नागरीकांपेक्षा आमदारांना त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते आवाज उठवत नाहीत. परंतु आम्ही आवाज उठवणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज