टीम मंगळवेढा टाईम्स ।
विमा कंपनीने नुकसान भरपाई रक्कम म्हणून ज्या वाहनाच्या नावे विमा पॉलीसी दिली त्याऐवजी दुसऱ्याच वाहनाची बनावट विमा तयार करून संगनमताने फसविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
धैर्यशील अरूण डोईफोडे व समाधान अरूण डोईफोडे (रा.बावी, ता.बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.
युनायटेड इंडिया कंपनीच्या बार्शी शाखेचे वरिष्ठ शाखा गंगाधर भिमाशंकर कांबळे (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.
सदर विमा कंपनीने समाधान डोईफोडे यांच्या एम भरावी एच १३ एएक्स ४८८२ या वाहनाचा दि. ३० मे २०१८ आहे, ते २९ मे २०१९ या कालावधीकरिता विमा उतरविलेला पॉलीसी होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्हा न्यायालयाकडून विमा कंपनीस समन्स मिळाले.
विमा दाखल केलेल्या केसचे हे समन्स होते. विमा कंपनीने सबाबत माहिती घेतली असता केसमधील पिडीत महिला गंगाबाई गणेश काळे यांचे पती हे अपघातात मयत इन्शोरन्स असून माढा पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे कंपनीस व्यवस्थापक समजले.
विमा कंपनीने कागदपत्रांची तपासणी केली याप्रकरणी असता मूळ विमा पॉलिसीतील वाहन, नाव, चेसी नंबर, मूळ विमा पॉलिसीचा मालक, विमा कालावधी आदीमध्ये बदल दिसून आला.
मूळ पॉलिसीतील वाहनाच्या ऐवजी दुसरेच वाहनाचा नंबर, चेसी नंबर, व नाव आढळले. सदर विमा पॉलिसीमध्ये बदल करून खोटा पुरावा तयार केल्याचे दिसून आले. सदर खोटी विमा पॉलिसी प्रत कोर्टात दाखल केली आहे.
सदरची मूळ खरी व कायदेशीर विमा पॉलिसी ही समाधान डोईफोडे यांच्या वाहनाच्या नावाने दिलेली असून त्याचे बनावटीकरण करून ठकवणूक करण्यासाठी धैर्यशील व समाधान या दोघा सख्ख्या भावांनी संगनमत करून
विमा कंपनीने नुकसान भरपाई रक्कम भरावी याकिरता खोटी व बनावट पॉलिसी तयार करून कंपनीस फसविण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाची तक्रार दिली आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक ढेरे करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज