टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठायुद्धा मनोज जरांगे – पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण
स्थगित करण्यासाठी दामाजी चौकात उपोषणस्थळी आज शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
कालच राज्य शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर सदर बैठकीत पाटील यांनी कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासनाला २ जानेवारी २०२४ पर्यंत अर्थात २ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे तसेच महाराष्ट्रात मराठा बांधवांच्या वरती दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटूंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशा अनेक मागण्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समाजाशी चर्चा करूनच आमरण रुपांतर उपोषणाचे साखळी उपोषणात करण्याचा निर्णय घेतला आहे,
पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा येथे गेली सात दिवस साखळी उपोषण सुरू आहे सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी कोणती भूमिका घेतली आहे व पुढील आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे.
याविषयी चर्चा करण्यासाठी व मंगळवेढयातील साखळी उपोषण स्थगित करण्यासाठी आज समाजाची बैठक बोलविण्यात आली आहे तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज