टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर येथील डॉ. प्रशांत निकम यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सुरू केलेल्या ‘ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल’चे लोकार्पण त्यांच्या मातोश्री पुष्पलता निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील होते.
डॉ. निकम यांनी अस्थिरोग क्षेत्रातील उच्च शिक्षणानंतर येथील सरगम चौकातील इमारतीत आपल्या वैद्यकीय सेवेला सुरूवात केली. देश-विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह या ठिकाणी त्यांनी अॅक्सीडेंट व तातडीच्या वैद्यकीय सेवेबरोबरच सांधेरोपण, ऑर्थोस्कोपी, फिजिओथेरपी अशा पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पूर्वीची इमारत कमी पडू लागल्याने डॉ. निकम यांनी येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात स्वतःच्या सुसज्ज इमारतीत ‘ट्युलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल’ची सुरूवात केली आहे.
या ठिकाणी अपघात व तातडीच्या विभागासह स्मार्ट आयसीयू, सांधेरोपण, विषबाधा उपचार, हृदयरोग व मेंदूरोग उपचार, डायलेसीस व मुत्ररोग, ऑर्थोस्कोपी उपचार, अत्याधुनिक फिजिओथेरपी, सीटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी उपचारांची सुविधा उपलब्ध केली आहे.
या हॉस्पीलटच्या लोकार्पण प्रसंगी शिक्षक मतदारसंघाचे माजी आ.दत्तात्रय सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, ‘सहकार शिरोमणी’ चे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश पाटील,
शहाजी साळुंखे, संतोष कोकाटे, डॉ. पोपट खंडके विश्वंभर कदम, डॉ. रोहन परिचारक दिलीप चव्हाण, राजूबापू गावडे, दिनकर कदम, अण्णा शिंदे, डॉ. मनोज भायगुडे, चंदाताई तिवाडी, प्रेरणा कोकाटे, राखी निकम आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.शरद पवार यांनी केले कौतुक
पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात एका अत्याधुनिक ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ‘ची भर घालून रुग्णसेवेत रूजू होत असलेल्या ‘ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल ‘ चा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कांही कारणाने ऐनवेळी खा. पवार यांचा दौरा रद्द झाला.
त्यामुळे खा. पवार यांनी आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण सोहळ्यात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. प्रशांत निकम यांच्या वैद्यकीय सेवेचे मनापासून कौतुक करत लवकरच आपण आवर्जून या अत्याधुनिक हॉस्पीटलला भेट देण्यासाठी येणार असल्याचा शब्द दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज