टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज सोमवार २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवप्रेमी चौकातील शिवालय येथे मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांच्या मुळ अंतरवाली सराटी या गावी उपोषण केले होते. त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.
यावेळी सरकारने १ महिन्याची मुदत मागितली होती. परंतू मराठा समाजाशी चर्चा करून १० दिवस वाढवून सरकारला ४० दिवसाची मुदत दिली होती. तसेच दि १४ ऑक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी येथे भव्य एल्गार सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
२४ ऑक्टोबर रोजी सदरची मुदत संपत आलेली असताना देखील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनास
पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज