टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी म्हणून चरण महादेव कोल्हे यांची नियुक्ती झाली असून ते आज बुधवार दि.१८ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान मंगळवेढा नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास रेंगाळला असे वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल नगरविकास विभागाने घेवून येथे पूर्णवेळ अधिकारी नेमल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची बदली शिरोळ येथे झाल्यानंतर येथे पुर्णवेळ मुख्याधिकारी न मिळाल्याने गेल्या चार महिन्यापासून प्रभारी मुख्याधिकाऱ्यावरच कारभार सुरु होता.
परिणामी पूर्णवेळ मुख्याधिकारी येथे नसल्यामुळे शहराचे विविध प्रश्न रेंगाळत पडल्याचे वृत्त नुकतेच प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेवून नगरविकास विभागाचे अव्वर सचिव यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी म्हणून चरण कोल्हे यांचा आदेश काढला असून हा आदेश नुकताच नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे.
चरण कोल्हे हे तत्पुर्वी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते. ते सन २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून सेवेत निवड झाली आहे.
त्यांनी आत्तापर्यंत कडेगांव तीन वर्षे, माढा चार वर्षे येथे कामकाज पाहिले असून मागील चार महिन्यापुर्वीच त्यांची बदली सांगली येथे झाली होती. ते मुळचे नारायणगाव जि.पुणे येथील आहेत.
दि.१९ रोजी मंगळवेढा येथील न.पा.मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्विकारणार असून शहरातील जनतेच्या कामांना येथे निवासी राहून पूर्णवेळ प्राधान्य देणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
माढा येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रमाई घरकुल योजनेचे ७५० घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने प्रशासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज