mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा योजना, शिंदे सरकारचा निर्णय; 20 रुपयांपासून सुरू होणार प्रीमियम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 27, 2023
in राज्य, शैक्षणिक
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल.

याचा प्रीमियम 20 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं.

या निर्णयानुसार, ही विमा योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल. “20 रुपये प्रीमिमय भरुन एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल.

तर 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास, 422 रुपये प्रीमियम भरावा लागेल.” असं या आदेशात म्हटलं आहे.

यात पुढे म्हटलंय, “प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.”

या योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

20 रुपये आणि 422 रुपये प्रीमियम असलेल्या योजना आयसीआयसीआयच्या असणार आहेत. तर 62 रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल.

या घटनांमध्ये मिळणार नाही कव्हर

आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता झालेले इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विद्यार्थी विमा

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
Next Post
परिचारकांची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी आणि उमेश परिचारकांची राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा?

ऊस दराबाबत चेअरमन उमेश परिचारक यांनी शेतकऱ्यांना दिला 'हा' शब्द; युटोपियन शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा