टीम मंगळवेढा टाईम्स।
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टार ‘टायगर’ सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘टायगर 3’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाची प्रतिक्षा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान दमदार लूकमध्ये दिसत आहे.
एवढंच नाही तर, भाईजान याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ट्रेलरची सुरुवात एका महिलेच्या (रेवती) आवाजाने होते. जी देशाची शांतता आणि देशाच्या शत्रूंमध्ये किती अंतर आहे हे सांगते.
देशाची शांतता आणि देशाच्या शत्रूंमधील अंतर सांगितल्यानंतर सलमान खान याची भन्नाट एन्ट्री होते. ट्रेलरमध्ये सलमान खान ऍक्शन सीन आणि बाइक स्टंट करताना दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान पुन्हा अविनाश राठोडच्या भूमिकेत दिसत आहे.
ट्रेलर बघा..
ट्रेलरमध्ये कतरिना कैफ देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान याचं त्यांच्या कुटुंबावर आणि देशावर असलेलं प्रेम दिसून येत आहे. पण ट्रेलरच्या शेवटी देश किंवा कुटुंब दोघांपैकी एकाला वाचवण्याची वेळ भाईजानवर येते. त्यामुळे सिनेमात पुढे काय होणार.
याची उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलरच्या शेवटी ‘आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा…’ असं सलमान खान म्हणताना दिसत आहे.
कधी प्रदर्शित होणार ‘टायगर 3’ सिनेमा
‘टायगर 3’ सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात इमरान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्या खांद्यावर आहे. ‘टायगर 3’ दिवाळीत थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या सिनेमाला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सलमान सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर देखील सलमान खान यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज