टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी (ता. १५) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या तोंडावर अत्यंत गंभीर बनलेला पीकविमा भरपाईचा प्रश्नासोबत अनेक विकासकामाच्या संदर्भात बैठका होत आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी (ता. १६) दिवसभर जिल्ह्याच्या विविध प्रश्न व विकासकामांच्या बैठकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा भरपाईचा प्रश्न गाजणार आहे.
जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढून पीकविमा कंपनीकडे भरपाईच्या २५ टक्के रकमेची मागणी केली. पण पीकविमा कंपनीने अद्याप त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
दिवाळीचा सण तोंडावर आल्याने जिल्हा प्रशासनाने भरपाई मिळावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. खरिपातील सर्वच पिके पावसाअभावी गेल्याने शेतकऱ्यांचे या प्रश्नाकडे लक्ष लागले आहे. या मुद्दयांवर पालकमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा होईल.
याशिवाय संभाव्य पाणी टंचाई, उजनी धरणातील पाणी नियोजन, शहरातील उड्डाणपूल, समांतर जलवाहिनी, विमानतळ या मुद्द्यांवर बैठकांमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
शेती विकण्याच्या कारणावरुन वृध्दास काठीने मारहाण, एका विरुध्द गुन्हा दाखल
ही शेती मला विकायची व परत येथे यायचे नाही, आला तर तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून एका ६५ वर्षीय वृध्दास काठीने बेदम मारहाण केल्या प्रकरणी अशोक संभाजी नलवडे (रा.तळसंगी) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अंबादास कानडे ( वय ६५ रा. तळसंगी) यांचे शेताशेजारी आरोपी अशोक नलवडे यांची शेतजमीन असून शेतजमीन मला का विकत देत नाही असे म्हणून फिर्यादी व फिर्यादीची पत्नी गोदाबाई हिस वारंवार शिवीगाळी, दमदाटी आरोपी करीत असे.
दि.८ रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा महेश शेतात गवत काढत असताना आरोपीने तेथे येवून शिवीगाळ करत शेतजमीन मला विकत दे असे म्हणाल्यावर फिर्यादी म्हणाले, ही जमीन माझी असून मला विकायची नाही, त्यावेळी आरोपीने अंगावर धावून जावून एकदा सांगीतलेले समजत नाही का ? असे म्हणून जोराने कानाखाली वाजवली.
त्याचवेळी हातातील काठीने फिर्यादीचे उजव्या हाताच्या पंजावर मारुन जखमी केले व तु इथे परत यायचे नाही, ही शेती मला विकायची आहे. अन्यथा तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज