टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्यामागील कारणही सांगण्यात आलं आहे.
नवरात्रीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळं गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा देणं शक्य नसल्याने पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
त्यामुळं आता गौतमीच्या चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सोलापुरात गौतमी येणार की नाही?, याबद्दलही अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
नवरात्री आणि दांडियाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापुरातील एका माध्यम समुहाने गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी रितसर परवानगी देखील मागण्यात आली.
परंतु नवरात्रीला पोलिसांना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी जावं लागणार आहे. मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळं आता राज्यातील अनेक ठिकाणी लावणीचे कार्यक्रम घेणाऱ्या गौतमी पाटीलला सोलापुरात मात्र नो-एन्ट्रीचा सिग्नल मिळाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
परिणामी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. याशिवाय कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातील गौतमीच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
त्यामुळं आता पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम होणार की नाही?, याबद्दल अनेकांनी साशंकता व्यक्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज