मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
रत्नागिरी नागपूर महामार्गावर – शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत कारने ठोकरल्याने आदम नबीसाहेब पाटील (वय ५५, रा. लवंगी, ता. मंगळवेढा) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
अपघातानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन पडली. यामध्ये कारमधील दोघे जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी झाला.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मृत आलम पाटील हे दुचाकीवरून (एम.एच. १०, डी.झेड. ८१४६ ) शिरढोणकडे येत होते.
कुचीच्या दिशेने जाण्यासाठी महामार्गाच्या दुसरीकडे जाण्यास ते वळले, याचवेळी पाठीमागून जयसिंगपूरहून कुचीकडे जाणाऱ्या कारने (एम.एच. ०९, बी.पी. ४५०९) त्यांना ठोकरले.
या अपघातात आलम पाटील हे जागीच ठार झाले. त्यानंतर कार रस्त्यावरून उताराने खाली गेली. यामुळे कारमधील दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. तपास पोलिस हवालदार सचिन आटपाडकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज