टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी कारखान्याचे कामकाज चालविताना पदभार घेतला तेव्हा कारखान्याची परिस्थिती अडचणीची होती.सर्व बॅकाची खाती एन.पी.ए होती.पण पहिल्याच हंगामात नवीन सभासद वाढविले,थकीत ऊस बील दिले,कामगार पगार देत अनेक बॅकाची देणी दिल्यामुळे कारखान्याला ब वर्ग मिळाला.असे प्रतिपादन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाच्या 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर शिवाजीराव काळुंगे,रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा,अॅड नंदकुमार पवार,रामचंद्र वाकडे,रामकृष्ण नागणे, उपाध्यक्ष तानाजी खरात,संचालक गौरीशंकर बरकुल,गोपाळ भगरे, मुरलीधर दत्तू,
राजेद्र पाटील,भारत बेदरे,दयानंद सोनगे,अशोक केदार औदुंबर वाडदेकर,सिध्देश्वर आवताडे,रेवणसिद्ध लिगाडे,तानाजी कांबळे,दिगंबर भाकरे,बसवराज पाटील, अँड.शिवानंद पाटील आदि उपस्थित होते
यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले की,गतवर्षी आमच्या संचालक मंडळाने पदभार घेतला त्यावेळी कारखान्याच्या खात्यावर फक्त 3 लाख शिल्लक होते,मार्गदर्शक प्रशांत परिचारक,भगीरथ भालके,प्रा.शिवाजीराव काळुंगे,राहूल शहा,रामकृष्ण नागणे,यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे हा कारखाना सुरू झाला.
ऊस उत्पादक शेतकय्रात 2280 एफ आर पी असताना 2300 रू दर ऊस गाळपास दिलेल्या शेतकय्राना दिला.काम करताना संचालक मंडळाने खर्च कपात केला.खासगी कारखान्याची स्पर्धा असताना कामगाराची पगार वेळेत दिली.
भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली.त्यामुळे जिल्ह्य़ात दामाजी तिसय्रा क्रमांकावर आला.तालुक्यात 10 लाख मे.टन ऊस उपलब्ध असताना कारखाना काटकसरीने चालवावा लागणार आहे.शिवाजीराव काळुंगे म्हणाले की,
दामाजी कारखान्यावर तालुक्यासह कर्नाटकातील शेतकय्राचा मोठा विश्वास आहे..धनश्री परिवाराने दामाजी कारखान्याला मदत करण्याची भूमिका कायम घेतली अॅड नंदकुमार पवार यांनी विद्यमान संचालक मंडळाने आर्थिक अडचणीतील दामाजी पहिल्याच हंगामात यशस्वी करून दाखवल्याबद्दल अभिनंदन केले
यावेळी विषय पत्रिकेचे वाचन प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी केले.आयत्यावेळी आलेल्या विषयासह सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.गौडाप्पा बिराजदार,भिवा दौलतडे,महादेव लवटे,विष्णूपंत आवताडे,पांडुरंग ताड,सुरेश कोळेकर, यादाप्पा माळी,
चंद्रशेखर कौडूभैरी,मारूती वाकडे,शिवाजी पवार,अॅड शिवानंद पाटील,सुनिल डोके,पप्पू स्वामी, किसन सावंजी,दौलत माने,मनोज माळी आदीसह विविध खात्याचे कर्मचारी सभासद, उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज