टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीक विमा ॲप अथवा टोल फ्री क्रमांक १८००११८४८५ या क्रमांकाचा वापर करावा.
तसेच टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी, बँक, अथवा कृषी व महसूल विभाग यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप २०२३ या हंगामाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप २०२३ मध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पीकविमा योजने अंतर्गत खरीप २०२३ मध्ये जिल्ह्यातील ६ लाख ७६ हजार असे त्यांनी सांगितले.
३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा उतरविलेला आहे, अशी माहिती श्री. गावसाने यांनी दिली.
सद्य:स्थितीत मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरु असून काही भागामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असू शकते. या पार्श्वभूमीवर, पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत पावसाच्या पाण्यामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट,
ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते,
तसेच सद्यःस्थितीत काही पिकांची काढणी सुरु असून अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकविण्यासाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठीच कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत गारपीट,
चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येते, असेही श्री. गावसाने यांनी कळविले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज