टीम मंगळवेढा टाईम्स।
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी
व कुणबी दाखला वंशावळीसाठी निजामशाही पुरावे मागणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज मंगळवेढा शहरात ‘सकल मराठा समाजा’च्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत यापुढेही विविध प्रकारची उग्र स्वरूपाची आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दामाजी चौकात यांच्या संत दामाजी पंत यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला.
मराठा समाजाचे आरक्षणाबाबत सुरू असणारे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासन प्रयत्न करीत असुन एक मराठा काय करू शकतो हे जालना येथील आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आंदोलक अर्धनग्न झाले.
शांततेच्या मार्गाने सुरू असणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या घटनेचाही यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. तसेच जालना येथील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात सकल मराठा समाजातील सर्व बांधवांनी सहभाग घेतला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज