टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील खटावकर मॉलला आज शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास भीषण आग लागली असून मॉलच्या वरील मजल्यावरून धुराचे लोळ मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे प्रयत्न मोठे प्रमाणावर सुरू आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सदर घटना समजताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
खटावकर मॉल मध्ये किराणा, जनरल स्टोअर, इलेक्ट्रिक, कपडे, चप्पल आदी सर्व प्रकारचे साहित्य मॉल मध्ये विक्रीसाठी आहे. आज सकाळी मॉल बंद होता. सकाळी 8 च्या सुमारास अचानक मॉलच्या वरील मजल्यावरून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.
काही वेळेतच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा सध्या सुरू आहे.
व्हिडीओ पाहा;-
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब नेण्यास कर्मचाऱ्यांना अडचण येत असल्याने पोलिसांनी गर्दी पांगविली.
घटनास्थळी आयपीएस अधिकारी नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आदी अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज