टीम मंगळवेढा टाईम्स।
आपल्या मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी काल अमानुष अत्याचार केले. महिला, लहान मुलांवर लाठीमार करीत त्यांना जखमी केले. याच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात राज्य सरकारचा अधिकार असो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
जालना येथील पोलिस लाठीमाराची तीव्र प्रतिक्रीया मंगळवेढा शहरात उमटली. सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकामध्ये जाहीर निषेध केला.
उद्या मंगळवेढा बंदची हाक
अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसानी मराठा समाजातील महिला, लहान मुले, वयस्कर माणसे व तरुणांवर लाठी हल्ला व गोळीबार करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी मंगळवेढा दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केले आहे.
सायंकाळी 6 वाजता निवेदन देण्यात येणार
उद्या रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा तालुका दिवसभर बंद ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष माऊली कोंडूभैरी यांनी दिली.
जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा राज्य सरकारचा निषेध केला. अमानुषपणे तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात करावे, अशी मागणी केली.
घटनेची चौकशी व्हावी
मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र त्या ठिकाणी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला गेला या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
कुणाच्या सांगण्यावरून मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला आहे याची सर्वंकष चौकशी व्हावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, पक्षनेते अजित जगताप, माजी नगरसेवक राहुल सावंजी, नारायण गोवे, शरद हेंबाडे, शिवाजी वाकडे, सचिन डोरले
अँड.राहुल घुले, युवराज घुले, मुरलीधर दत्तू, विठ्ठल गायकवाड, स्वप्निल निकम, संतोष पवार, सतीश दत्तू, नितीन इंगळे, माऊली कोंडुभैरी, दयानंद दत्तू, राजेंद्र चेळेकर, विक्रम भगरे, आनंद मुढे, हर्षद डोरले आदींचा आंदोलनात सहभाग होता.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज