टीम मंगळवेढा टाईम्स । व्याजाने घेतलेल्या एक लाख रुपयांची परतफेड करूनसुद्धा, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याकाठी बारा हजार रुपये सक्तीने वसूल करणाऱ्या बजरंग प्रल्हाद आवताडे ( वय ५६ , रा . निराळे वस्ती ) या सावकारावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. Crime against Solapur moneylender who recovered even after repayment
नागनाथ वाल्मीक नाईकवाडी ( वय ५५ , रा . सादिक अपार्टमेंट अग्रवाल क्लिनिकशेजारी फॉरेस्ट न्यू तिहेगाव ) सोलापूर महानगरपालिकेमध्ये मजूर म्हणून कामाला आहेत. घरगुती अडचणीमुळे २००८ साली त्यांनी बजरंग आवताडे यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.
त्यांनी डिसेंबर २०१३ साली सर्व रक्कम व्याजासह परत केली होती. असे असताना आणखी एक लाख साठ हजार रुपये येणे आहे असे सांगून , बँकेचे पासबुक , कोरे चेक व कोरा बॉण्ड देण्यास नकार दिला. प्रत्येक महिन्याला पगाराच्या दिवशी बजरंग आवताडे हा नागनाथ नाईकवाडी यांना मोटरसायकलवर बसवून फलटण गल्ली येथील बँकेत घेऊन जात होता.
तेथून पगार काढल्यानंतर त्यातील बारा हजार रुपये सक्तीने काढून घेत होता. यास कंटाळून नाईकवाडी यांनी सदर बझार ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज