मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा येथील महसूल विभागाकडून कोतवाल पदाची भरती प्रक्रिया चार गावासाठी राबविण्यात आली होती.
दरम्यान कोतवाल पदाची निवड यादी नुकतीच तहसिल कार्यालयाच्या फलकावर प्रसिध्द करण्यात निवड जाहीर करण्यात आली आली आहे.
मंगळवेढा कोतवाल पदासाठी भटक्या जमाती वर्गातील साईनाथ जरग (गुण ५२), नंदेश्वर इतर मागासवर्गासाठी अमिर शेख ( गुण ५६), मुढवी अराखीव स्त्री वैष्णवी जाधव ( गुण ४२), मरवडे अराखीव पदासाठी विजय पवार ( गुण ५६ ) असे चार गावच्या कोतवाल पदासाठी आदींची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या पदासाठी रविवारी १०० गुणाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये पदवीधर, डी. एड., इंजिनिअर अशा विदयार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. या पदासाठी केवळ इयत्ता चौथी शैक्षणिक पात्रतेची अट असताना पदवीधर विद्यार्थ्यांनीही अर्ज केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत होते.
दरम्यान तहसिलदार मदन जाधव यांनी परीक्षा केंद्रावर ठाण मांडल्याने कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा पार पडल्या होत्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज