मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्पदंश आणि अॅपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.
आमदार दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आजारांची संख्या वाढवण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मदत पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. सुरुवातीला साधारणतः ९५० आजारांचा समावेश केला होता.
ही संख्या १९०० पर्यंत वाढवली आहे. सर्पदंश, अॅपेंडिक्सचा त्यात समावेश करावा, अशी मागणी केली होती. मंत्री सावंत यांनी यावर उत्तर दिले.
महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत सर्पदंशासाठी उपचार उपलब्ध आहेत. सर्पदंशासाठी लागणारे इंजेक्शन देखील शासकीय दवाखान्यात मोफत दिले जाते.
आता सर्पदंश आणि अॅपेंडिक्सचा या योजनेत समावेश केला जाईल. तसेच या योजनेत समावेश करायच्या नव्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत केली जाईल. समिती त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सावंत यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज