मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेलेले भगीरथ भालके हे विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज पंढरपुरात दिला.
भगीरथ भालके यांच्या बीआरएस पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे आज मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस या पक्षात प्रवेश करणार आहेत. भालके यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नसल्याचा दावाही उमेश पाटील यांनी केला आहे.
भगीरथ भालके हे विधानसभेसाठी लागणाऱ्या खर्चाच्या यंत्रसामुग्रीच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बीआरएस पक्षात गेले आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट, राष्ट्रवादी जोमाने काम करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार (स्व.) भारत भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात उभा केलेला विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनीही भगीरथ भालके यांची साथ सोडल्याचे यावेळी दिसून आले.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु भगीरथ भालके हे कसे निवडून येतात, तेही आम्हाला आता बघायचे आहे, असाही इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरा साठे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, अनिता पवार, नागेश फाटे, चंद्रशेखर कोंडुभैरी, मुझमील काझी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज