मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची गाडी फोडून एकाला जखमी केल्याप्रकरणी काळे समर्थक असणाऱ्या आठ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निकालाच्या मतमोजणी दिवशी शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे कंपाऊंड जवळ अभिजीत पाटील यांच्या एम एच 13 सीटी 9799 या क्रमांकाच्या चारचाकी गाडीमध्ये अशोक नामदेव काळे (रा. वाडीकरोली) त्याने दगड फेकून गाडीवर मारल्याने काच फुटली.
यामुळे गाडीमध्ये बसलेले किरण लक्ष्मण घाडगे (वय २४, रा. देगाव, ता. पंढरपूर) यांच्या डोक्यात दुखापत झाली. त्याच्याबरोबर असलेले कुमार रामचंद्र लांबकरणे, बळीराम यमन लामकाने दोघे राहणार पिराची कुरले
व इतर तीन अनोळखी इस्मानी किरण घाडगे यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर गाडीच्या उजव्या दरवाजाची दगड मारून काच फोडून गाडीचे नुकसान केले.
याबाबत किरण घाडगे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात वरील आठ जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एकास अटक, इतरांचा शोध सुरू
यानंतर पोलिसांनी बळीराम यमन लामकाने याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर इतर पाच जणांचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले.(स्रोत; लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज