मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क
नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे मागील महिन्यापूर्वी विजेच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस पडला होता, यावेळी गरंडे वस्ती येथे वीज पडून शेतकरी सिध्दनाथ नामदेव गरंडे यांच्या चार जनावरांचा मृत्यू झाला होता.
भैरवनाथ शुगरचे संस्थापक नामदार. प्रा. डॉ.तानाजीराव सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
भैरवनाथ शुगर हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे. त्याच बांधीलकीतून आज शेतकरी सिध्दनाथ नामदेव गरंडे यांना
अनिल (दादा) सावंत व्हा.चेअरमन भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांच्या माध्यमातून २५००० /- रु. ची रोख आर्थिक मदत अशोक चौंडे व कृष्णदेव लोंढे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी पै.ता.प्रमुख मंगळवेढा बंडू करे, मारुती गरंडे, चेअरमन कोंडीबा पतसंस्था नंदेश्वर बजरंग चौंगुले गुरुजी, ज्ञानेश्वर गरांडे, ज्ञानू गरंडे,कुंभार गुरुजी,कोंडीबा दौलतोडे आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज