मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
मुंबई येथे झालेल्या राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
डॉ.सावंत यांनी संपूर्ण राज्यातील जवळपास चार कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करून ६५ हजार महिलांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. शिवाय एक ते पंधरा या वयोगटातील जवळपास दोन कोटी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून सुदृढ निरोगी पिढी निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे, अशा शब्दात आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे कौतुक केले.
या बैठकीसाठी शिवसेना पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे सचिव, प्रवक्ते, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत बोलताना येणाऱ्या काळात शिवसेना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांकडे देण्यात आली असून येणारी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेना, भाजप व मित्रपक्ष एकत्रित लढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
शिवसेना-भाजपमध्ये स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये काही नाराजी असेल तर ही नाराजी दूर करण्यासाठी एक राज्यस्तरीय व जिल्हा स्तरावरील कमिटी नेमली जाणार आहे.
शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न काहीजण करत असून त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. माझ्याबरोबर आलेल्या ५० आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे.
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करा. संपूर्ण जगात पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारतवासीयांची मान ताठ झाली आहे. भारत हा एक जगातील शक्तिशाली पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज