मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे.
पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जेवढ्या जागा
तेवढेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून फक्त निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे.
त्यामुळे जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या विचारांवर तसेच सिध्देश्वर आवताडे यांच्या नेतृत्वावर संघाच्या सभासदांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाची सन-2023-27 या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. याबाबत नवनिर्वाचित 15 संचालकांनी सभासदांचे आभार व्यक्त केले.
या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदार संघातून विद्यमान चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, संजय नागणे, महादेव जगताप, सिध्देश्वर कनशेट्टी, मलाप्पा चोखंडे, शशिकांत भिंगे, राजेंद्र पाटील, व्यक्तिगत प्रतिनिधी राजेंद्र चेळेकर, सोमलिंग हाताळी, लक्ष्मण धसाडे,
विमुक्त जाती भटक्या जमाती – श्रीकांत पुकळे, इतर मागासवर्ग – भीमराव येडवे, अनुसूचित जाती जमाती – विशाल जाधव तर महिला राखीव मधून – सविता गवळी, उमा पाटील हे संचालक मंडळ बिनविरोध निवड आले आहे.
जेष्ठ नेते बबनराव आवताडे हे फक्त मार्गदर्शनाची भूमिका पार पाडत आहेत, त्यांनी नवीन युवकांसह कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली.
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे हे कामकाज पाहत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज